Take a fresh look at your lifestyle.

स्वतःला आऊटसायडर म्हणवणारा रणवीर सिंग खोटारडा! रंगोली चंडेलचं खरमरीत ट्विट

सोशल कट्टा । ‘गली बॉय’ सिद्धांत चतुर्वेदीचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्ही पहिलाच असेल. त्याच्यावरच बोलताना रंगोली चंडेलने ट्विटरवरचा एक फोटोचा रेफरन्स घेऊन त्याच्यावर खरमरीत ट्विट केलं आहे. ट्विटवर ती निर्भीडपणे तिचं मत मांडत असते. तिने अभिनेता रणवीर सिंगवर टीकेची तोफ डागली आहे. ‘रणवीर सिंग खोटारडा’ असल्याचं तिने म्हटलं आहे.

एका नेटीझनने रणवीरच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत सोनम कपूर आणि रणबीर कपूरदेखील दिसून येत आहे. फोटो शेअर करुन, “रणवीर खोटारडा असून तो लहानपणापासून रणबीर आणि सोनमला ओळत आहे”, असं म्हटलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर रंगोलीने लगेच त्यावर तिची प्रतिक्रिया दिली.

पुढे ती म्हणते “ज्यांचे आई-वडील श्रीमंत असतात. ज्यांची एक ओळख असते आणि संधी उपलब्ध असतात असे लोक बाहेरुन आलेले नसतात. उलटपक्षी जे लहान गावातून येतात, ज्यांना नीट इंग्लिश बोलता येत नाही आणि त्यांचं शिक्षणदेखील साध्या शाळेत झालेलं असतं. तसंच ज्यांच्याकडे डिझायनर कपडे नसतात, त्यांना चुकीची वागणूक दिली जाते ते बाहेरुन आलेले असतात, असं रंगोली म्हणाली. पुढे ती खोचकपणे म्हणते, “या तीन विद्वान व्यक्तींना सहानभूतीची आणि अटेंशनची गरज आहे. चला तर मग या गरजूंची आपण मदत करु”.

सिद्धांतची ‘रिअल स्ट्रगल’ ची कंमेंट व्हायरल होत असताना रांगोलीची ट्विट सुद्धा सोशल मीडियावर बरीच शेअर होतीय.

 

Comments are closed.

%d bloggers like this: