Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणामुळे कंगनाच्या बहिणीचे ट्विटर अकाऊंट झाले बंद

मुंबई | ट्विटरचे नियम मोडल्याने अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी बंद करण्यात आले आहे. ट्विटरने ही कारवाई केली आहे. रंगोली चंडेल ही ट्विटरवर नेहमीच वादग्रस्त कारणासाठी चर्चेत राहिली आहे. मात्र ती आपल्या ट्विट्सद्वारे द्वेष पसरवत असल्याने ट्विटरने तिचे अकाऊंट बंद केले आहे.

कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी तिची बहीण रंगोली ट्विटरवर नेहमीच चर्चेत असते. कंगनाविषयी किंवा इतर चालू घडामोडींवर ती सतत ट्विट करताना दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केल्याने ती चर्चेत आली आहे. मात्र ती ट्विटर वरून द्वेष पसरवते म्हणून तीच अकाऊंट बंद करण्यात आल आहे.

दरम्यान महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वाची गरज आहे’,असं म्हणत तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. तिच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे तीच अकाऊंट बंद करण्यात आल.