Take a fresh look at your lifestyle.

रणवीरने ‘या’ अभिनेत्रीसोबत २३ वेळा किसींग सीन दिला; दीपिका पदुकोण म्हणाली..

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । २१०६ साली आलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट हा चांगलाच चर्चेत आला होता. दिगदर्शक आदित्य चोप्रा यांनी नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या चौकटीतून हा सिनेमा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची चर्चा सर्वत्र झाली होती. हा सिनेमा रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या केमिस्ट्रीमुळे लोकांना आवडला होता. तसेच चित्रपटात वाणी आणि रणवीर चे बरेच किसिंग सीन दाखविण्यात आले होते. या किसिंग सीनची चर्चा पुन्हा एकदा झाली आहे. ते दीपिका पदुकोणच्या एका विधानामुळे तिने या चित्रपटात एकूण २३ किसिंग सीन होते असे म्हंटले आहे. पण ती स्क्रिप्टची गरज होती आणि तशी गरज असेल तर करावेच लागते असे तिने म्हंटले आहे.

बेफिक्रे हा बोल्ड सिनेमा म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्य चोप्रा यांनी चौकटीबाहेरच्या कथानकाला हात घातल्याची चर्चा झाली होती. व त्यांनी एक नवीन प्रयोग केल्याबद्दल कौतुकही झाले होते. या सिनेमातील चुंबनदृश्य पाहून दीपिकाने दिलेली ही प्रतिक्रिया ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. रणवीर आणि दीपिका हे एकाच क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी एकमेकांना सूट दिली आहे. म्हणूनच या दृश्यांवर दीपिकाने आक्षेप घेतलेला नाही.

दीपिका आणि रणवीर हे पती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावरही दोघांमधील मैत्रीच्या पोस्ट पाहायला मिळतात. तसेच अनेक पुरस्कार सोहळ्यातही रणवीर व दीपिका यांचे प्रेम दिसून आले आहे. हे किसिंग सीन कामाचा भाग असतात. त्यामुळे रणवीर चित्रपटांमध्ये किसिंग सीन देतो आणि माझा त्यावर काहीच आक्षेप नाही असेही तिने सांगितले आहे. लवकरच ही जोडी कपिल देव यांच्या जीवनावरील सिनेमा ‘८३’ मध्ये झळकणार आहे. याअगोदर दोघांनी गोलियो कि रासलीला, बाजीराव मस्तानी या सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. प्रत्यक्ष आयुष्यात यांची जशी केमिस्ट्री आहे तितकीच ती पडद्यावरही नेहमीच दिसून येते.