Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन नंतर रश्मी देसाई राहणार नाही नागीन ४ चा हिस्सा; ‘हे’ आहे कारण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बिग बॉस १३ मुळे चर्चेत आलेल्या रश्मी देसाई हिला नंतर ‘नागीन ४’ या मालिकेमध्ये भूमिका मिळाली. रश्मी देसाईने या सीरियलमध्ये ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखा शालाकाचा पहिला लूकही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती अशी की या लॉकडाऊननंतर रश्मी देसाई यापुढे नागिन -४ चा भाग असणार नाही.

होय मिळालेल्या एका वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबली आहे. तसेच या शोच्या शूटिंग आणि कथेला बराच ब्रेक लागला आहे आणि यामुळे शूटिंग सुरू झाल्यानंतर ‘नागीन ४’ या शोच्या मेकर्सने स्टोरीमध्ये थोडा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत रश्मी देसाईची भूमिका फार जुनी नाही आहे, म्हणून निर्माता ही भूमिका बंद करण्याचा विचार करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, चॅनलने नुकतीच नागिन -४ च्या निर्मात्यांची आणि संपूर्ण कलाकारांची एक बैठक घेतली. यानंतर रश्मी देसाईला सांगण्यात आले की या शोमध्ये तिच्या शालाकाच्या भूमिकेचा विस्तार यापुढे केला जाणार नाही. आता चॅनेल आणि शोचे निर्माते या शोच्या बजटमध्ये कमी करत आहेत आणि रश्मी देसाई त्यांच्यासाठी ती एक अतिशय महागडी रिसोर्स ठरत आहे. ती या मालिकेसाठी मोठी फी पण घेते. ज्यामुळे आता तिचे पात्र या मालिके मधून काढून टाकले जात आहे.

लॉकडाउनच्या अगदी आधीपर्यंत रश्मी या शोचा एक भाग होती. या शोमध्ये रश्मी व्यतिरिक्त निया शर्मा, सयंतनी घोष, चमेली भसीन आणि विजयेंद्र कुमेरिया मुख्य भूमिकेत होते. रश्मी देसाईने याबाबत अजुनपर्यन्त कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.