Take a fresh look at your lifestyle.

रश्मिकाच्या घरी सनई चौघड्याची तयारी..?; नॅशनल क्रश कुणाच्या प्रेमात? जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नॅशनल क्रश, लाखों दिलों की धडकन जिच्या एका स्माईलने तरुणांची मनं घायाळ होतात अशी अत्यंत सुंदर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला कोण ओळखत नाही..? ती नेहमीच ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो असो नाहीतर व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील रश्मिका केवळ साऊथमधील चाहत्यांसाठी नव्हे तर इतर अनेक भाषिक चाहत्यांसाठी खास आहे. कितीतरी तरुण चाहते तिच्या प्रेमात आहेत. मात्र नव्याकोऱ्या माहितीनुसार, रश्मिकाची रिअल लाईफ केमिस्ट्री विजय देवरकोंडा सोबत जुळली आहे आणि लवकरच ते लग्न करणार आहेत अशी माहिती आहे. अद्याप अशी कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी सोशल मीडियावर मात्र हीच चर्चा आहे.

अलीकडेच रश्मिकाच्या ‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट नुसता हिट नाही तर सुपरहिट ठरला आहे. यानंतर आता रश्मिकाबद्दलची ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि नाराजी असे दोन्ही सूर दिसत आहेत. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री तर होतीच पण आता यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हे दोघे मुंबईत डेटवर जात असल्याच्या चर्चांना उधाण आलय. शिवाय त्यांचे लवकरच लग्न होणार अशीही माहिती आहे. हे दोघेही लवकरच लग्नबंधण्यात अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याचवर्षी त्यांचं लग्न होऊ शकतं अशीही चर्चा आहे. मात्र, अजूनही रश्मिका आणि विजय यांनी आपल्या नात्यावर काहीही भाष्य केलेले नाही.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. चाहत्यांनी विजय आणि रश्मिका यांच्या जोडीला आधीच पसंती दिली होती. शिवाय अनेकांनी विजय आणि रश्मिका यांनी लग्न करावे असे म्हटले होते.

यानंतर आता रश्मिका आणि विजय रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या वर्षाखेरीस ते लग्न करू शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. सध्या विजय देवरकोंडा पुरी जगन्नाध आणि लायगरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तर रश्मिका तिच्या पुष्पा चित्रपटाचे यश अनुभवतेय.