Take a fresh look at your lifestyle.

रश्मिका मंदनाच्या घरावर आयकर विभागाचा छापा! सर्वाधिक मानधन घेत असल्याची शंका

टीम, हॅलो बॉलीवूड । रश्मिका मंदना ही कन्नड अभिनेत्री असून ‘किरिक पार्टी’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. तिने नुकतंच दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत ‘सरिलेरु नीकेव्वरू’ या चित्रपटात काम केलं. यासोबतच ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडा याच्यासोबतही ती ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या.

View this post on Instagram

✨🐒

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna) on

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या कर्नाटकमधल्या घरी गुरुवारी सकाळी आयकर विभागाने छापा मारला. कोडुगू जिल्ह्यातील विराजपेठ इथल्या तिच्या घरी सकाळी ७.३० वाजता आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले. यावेळी रश्मिका तिच्या घरी नव्हती अशी माहिती समोर येत आहे. आयकर विभागाच्या दहा अधिकाऱ्यांकडून रश्मिकाच्या घराचा तपास सुरु असताना तिचे आई-वडिल उपस्थित होते. रश्मिका हैदराबादमध्ये शूटिंगसाठी गेली असल्याने तिला याची कल्पना नव्हती, अशी माहिती तिच्या मॅनेजरने दिली.

यावर ‘पिंकविला’ या वेबसाइटला तिने मुलाखत दिली, ही सर्वाधिक मानधन घेणारी दक्षिणेतील अभिनेत्री असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. ती म्हणाली, “अशा चर्चा कुठून पसरतात हेच कळत नाही. हा एवढा पैसा कुठून येतो आणि कुठे जातो हेच मला कळत नाही. माझ्या बँकेतही फार पैसे नाहीत. मी एखादी नवोदित कलाकार आहे असंच मला वाटतं. मला जर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनायची असेल तर सहा वर्षे सलग न ब्रेक घेता काम करावं लागेल. तेव्हा कुठे मला सर्वाधिक मानधन मिळू लागेल.” आयकर विभाग खाली हाताने परत गेला.

 

View this post on Instagram

🌸

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna) on

Comments are closed.

%d bloggers like this: