Take a fresh look at your lifestyle.

जरा त्याबद्दल अभिनेत्यांनाही विचारा – रविना टंडन

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । रवीना टंडन हिनं प्लास्टिक सर्जरीबद्दलचा मुद्दा उपस्थित केलाय. यासाठी नेहमी अभिनेत्रींनाच धारेवर धरलं जातं, तो प्रश्न कधी अभिनेत्यांनाही विचारा, असं ती म्हणते. फिटनेस आणि सौंदर्य या दोन गोष्टी राखण्यासाठी सर्व कलाकारांना नेहमीच मेहनत घ्यावी लागते. अनेकदा प्लास्टिक सर्जरी हा मुद्दा त्यात चर्चेत असतो. अमुक एका कलाकारानं नाकच बदललं, तर तमक्या एकाने चेहऱ्याची रचना बदलली, कोणी त्वचेवर उपचार घेतले, तर कोणी फेअरनेस ट्रीटमेंट घेतली असे अनेक हे मुद्दे चर्चेत असतात. यात अभिनेत्रींना नेहमीच ओढलं जातं, कधी अभिनेत्यांनाही त्याविषयी विचारा, असं रवीना टंडन हिने स्पष्ट केला आहे.

रवीनानं नुकतीच करिना कपूर होस्ट करत असलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तेव्हा तिनं संबंधित मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली, ‘ अमुक अभिनेत्रीनं सर्जरी केली,तिने बोटॉक्स केलं याची चर्चा नेहमीच असते. मात्र अभिनेत्यांना त्यात सूटच मिळते. मला एक कळत नाही,अभिनेत्यांनी तरुण राहण्याचा काही वेगळा फॉर्म्युला शोधून काढला आहे का, तसं असेल तर त्यांना त्याबद्दल विचारायलाच हवं. ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाचा सिक्वेल येणार होता त्यावेळी अभिनेते कायम राहतील, मात्र मात्र मी आणि करिष्मा रिप्लेस होणार अशी बातमी वाचली तेव्हा हसायला आलं.’ चित्रपटांच्या ऑफर येत आहेत, मात्र मला आवडेल असा चित्रपट मिळाला, तर ती बातमी मी स्वतः चाहत्यांना सांगेन, असंही ती म्हणाली.