Take a fresh look at your lifestyle.

निर्भया दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्यावर ऋषि कपूर झाले संतप्त, त्यांनी ट्विट केले-“हास्यास्पद…”

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । निर्भया खटल्यातील दोषींना आज फाशी देण्यात येणार होती, परंतु मागील दोन्ही वेळेप्रमाणे या वेळीही त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली. सर्वसामान्यांसह बॉलिवूड अभिनेता ऋषि कपूर यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निर्भया प्रकरण टांगल्याबद्दल संताप व्यक्त करत त्यांनी आपल्या ‘दामिनी’ चित्रपटाचा एक संवादही शेअर केला आहे.यावेळी निर्भया प्रकरणाबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की दोषी पवन गुप्ता यांची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे, अशा प्रकरणात त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही.

 

निर्भया प्रकरणावरुन संतापलेल्या ऋषि कपूर यांनी ट्विटरवर अश्लील आणि हास्यास्पद असे म्हणत संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले,” निर्भया प्रकरण. तारखेची तारीख, तारखेची तारीख, तारखेची तारीख – ‘दामिनी’. हास्यास्पद.” ऋषि कपूर यांचे निर्भया प्रकरणातील ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे, त्याचबरोबर लोकही यावर प्रतिक्रियाही करीत आहेत सोमवारी कोर्टाने निर्भया प्रकरणातील फाशीच्या शिक्षेला पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली. शिक्षेचा आधार घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा म्हणाले की, राष्ट्रपतींसमोर प्रलंबित असलेल्या दोषी पवन गुप्ताची दया याचिका निकाली निघेपर्यंत फाशी दिली जाऊ शकत नाही.

‘दामिनी’ चित्रपटामध्ये ऋषि कपूर तसेच अभिनेता सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांनीही काम केले होते.या चित्रपटात आपल्या घरातील घरकाम करणाऱ्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार होतो आणि तिला न्याय मिळावा म्हणून खूप संघर्ष करावा लागनाऱ्या एका गृहिणीची कथा दाखविली आहे. मीनाक्षी शेषाद्री हि प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटात कोर्टात सुनावणी दरम्यान सनी देओल हे संवाद बोलताना दिसून येतात.