Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता ऋषि कपूर यांनी दिवंगत निर्माते मनमोहन देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक शेअर केला आठवणीतला फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ऋषि कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात, ते बर्‍याचदा सोशल मीडियावर जुने फोटोज् शेअर करत असतात. आज चित्रपट निर्माता मनमोहन देसाई यांच्या वाढदिवशी ऋषि कपूर यांनी त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ऋषि कपूर यांनी मनमोहन देसाई यांच्यासोबत ‘अमर अकबर अँथनी’ मध्ये काम केले आहे. अमर अकबर अँथनी याचं दिग्दर्शन आणि निर्मिती मनमोहन देसाई यांनी केली होती.

ऋषि कपूर यांनी मनमोहन देसाई यांच्यासमवेतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिल- आज त्यांच्या वाढदिवशी मनमोहन देसाई यांची आठवण काढत त्यांनी सांगितले कि , त्यानी सर्व कपूरबरोबर काम केले आणि आम्हा सर्वांना ते खूप आवडले. देव त्यांना शांती देवो.

मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो ‘नसीब’ चित्रपटाच्या सेटवरचा आहे.मनमोहन देसाई यांनी ‘कुली’, ‘मर्द’, ‘तुफान’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली.