Take a fresh look at your lifestyle.

बिहारमधील रस्त्याला सुशांतचे नाव; चाहत्यांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच चकित केले. सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, बिहार येथे अभिनेता सुशांतसाठी त्याच्या गावी पूर्णियामध्ये एक चौक आणि एका रस्त्याला सुशांतचे नाव देण्यात आले आहे.

अभिनेता सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी मूळ गावी पूर्णिया येथील फोर्ड कंपनी चौकचे नामकरण सुशांतसिंग राजपूत चौक नामकरण करण्यात आले. गुरुवारी महापौर सविता सिंग यांनी फलक लावून दोन्ही ठिकाणांची विधिवत नावे दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसरीकडे फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेकांनी, विशेषत: बिहारमधील लोकांनी सुशांत सिंगच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, हे लक्षात ठेवा की मागील महिन्यात पोस्टमॉर्टम अहवालात म्हटले आहे की सुशांत स्फिक्सियामुळे मरण पावला आहे, याचा अर्थ सुशांतच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही.