Take a fresh look at your lifestyle.

सचिन पिळगावकर यांनी सांगितला आपल्या मुलीचा ‘हा’ किस्सा…

0

चंदेरी दुनिया । कलर्स मराठी या वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘दोन स्पेशल’ या रिऍलिटी टॉक शोमध्ये अनेक कलाकारांनी आजवर मान्यवर म्हणून शोच्या मंच्यावर हजेरी लावली आहे. जितेंद्र जोशीसोयाबीत गप्पा मारताना कलाकार नेहमीच आपल्या आयुष्यातील काही खास किस्से आणि त्यांची इंडस्ट्रीमधील संघर्षाची कहाणी सांगत असतात. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतीच या दोन स्पेशलच्या मंचावर हजेरी लावली होती. विविध विषयांवरील गप्पांचा आस्वाद घेत असताना, त्यांनी एक असा किस्सा सांगितला जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

जितेंद्र जोशीने सचिन पिळगावकर यांना एका प्रश्नाचं उत्तर विचारलं असता, त्यांच्या लेकीचं म्हणजेच श्रिया पिळगावकरचं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये पदार्पण कसं झालं हे त्यांनी सांगितलं. शोदरम्यान जितेंद्रने सचिन यांच्यासोबत एक खेळ खेळाला. या खेळादरम्यान तुम्ही श्रियाला अमूक गोष्ट कर किंवा करू नकोस असं काही सांगितलं आहे का? असा प्रश्न जितेंद्रने विचारला. त्यावर उत्तर देताना सचिन म्हणाले, “मी तिला कधीही या गोष्टी सांगण्याच्या भानगडीत पडलो नाही आणि ती कोणाचं ऐकणार सुद्धा नाही”.

सचिन तो संपूर्ण किस्सा सांगताना म्हणाले, “मी तिला एकदा सांगितलं की मला चित्रपट करायचा आहे. तर तू त्यात काम करशील का?” पण त्यावर ती म्हणाली की मला स्क्रिप्ट द्या त्यानंतर मी ठरवेन. हे उत्तर ऐकून मी थक्क झालो होतो.”

दरम्यान सचिन यांचा दोन स्पेशलचा विशेष भाग लवकरच टेलिकास्ट होणार असून त्यात अवधूत गुप्ते सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: