Take a fresh look at your lifestyle.

सई ताम्हणकरच्या पायाला दुखापत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सई ताम्हणकर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजस्थानला गेली आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव आहे मिमी.सई चा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होतो आहे ज्यामध्ये तिच्या पायाला दुखापत झालेली दिसून येत आहे. मिमीच्या शूटिंग दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तरी देखील सई ने शूटिंग थांबवले नाही. शूटिंग संपवून हॉटेल मध्ये परतत असताना तिचा पाय मुरगळला आणि पायाला सूज आली. डॉक्टरला दाखविल्यानंतर कळले कि तिच्या पायाला फ्रॅक्चर आहे.

यावर बोलताण सईने सांगितले की,’जेव्हा पाय फ्रॅक्चर झाल्याचे कळले तेव्हा मी खूप घाबरले. आता चित्रपटाचे शूटिंग कसे करायचे याची मला चिंता होती. शूट थांबवले तर त्याचा असा हा संपूर्ण टीम वर पडेल. पण मी खरंच खूप नशीबवान आहे कारण संपूर्ण टीम ने मला खूप सांभाळू घेतले आणि मग मी माझे शूट चालूच ठेवले.

 

मिमी हा चित्रपट मराठी सिनेमा मला आई व्हायचंय यावर बेतलेला आहे. यामध्ये क्रिती सॅनॉन हि सरोगेट मदरच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. ‘लुकाछुपी’ फेम लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.तर सुप्रिया पाठक आणि पंकज त्रिपाठी हे देखील यामध्ये महत्वाची पात्रे साकारत आहेत.