Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानने पाकिस्तानी आयोजकाचा ‘शो’ केला रद्द !

टीम, हॅलो बॉलीवूड । आपल्या सुपरस्टार्सचं स्टारडम मोठं असल्याने त्यांना बऱ्याच ठिकाणहून बऱ्याच ऑफर्स असतात. बॉलिवूडचा दबंग खान सलमानचे परदेशातही लाखो चाहते आहेत. त्याला पडद्यावर पाहण्यासोबतच प्रत्यक्षात पाहण्यासाठी लाखो चाहते गर्दी करतात. नुकताच सलमानने त्याचा अमेरिकेत होणारा एक लाइव्ह परफॉर्मन्स शो रद्द केला.

   अमेरिकेतील ह्यूस्टन येथे सलमानचा एक शो आयोजित करण्यात आला होता. हा शो पाकिस्तानी इवेंट ऑर्गनायजर रेहान सिद्दीकीने आयोजित केला होता. रेहान हा पाकिस्तानचा नागरिक आहे. रेहानवर अमेरिकेने भारत विरोधी कारवायांसाठी निधी गोळा केल्याचा आरोप केला आहे. तसेच तो ह्यूस्टनमध्ये सीएए विरोधात प्रदर्शन करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सलमानने रेहानने आयोजित केलेला हा कार्यक्रम रद्द केला आहे. त्याच्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

   याआधी रेहानने बॉलिवूडमधील जवळपास ४०० हून अधिक कार्यक्रम त्याने केले आहेत. यामध्ये सैफ अली खान, मीका सिंह, पंकज उदास आणि रॅपर बादशाह यांचा समावेश आहे. सलमानपूर्वी गायक-अभिनेता दिलजीत दोसांजने रेहानचा कार्यक्रम करण्यास नकार दिला होता. यावर आता ट्विटरवर त्याच कौतुक होत आहे.