Take a fresh look at your lifestyle.

‘कोरोना व्हायरस’टाळण्यासाठी सलमान ने सुचवला हा उपाय

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना व्हायरस जगभर पसरला आहे. भारतातही २९ जणांना लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने प्रत्येकाला कोरोना व्हायरसपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.सलमानने आपला फोटो शेअर करताना सल्ला दिला आहे.त्याचा सल्ला तुम्हाला भारतीय संस्कृतीची आठवण करून देईल.

जिममध्ये हात जोडून सलमान खानने फोटो शेअर करताना लिहिले -‘नमस्कार… नमस्कार आणि सलाम हि आपली सभ्यताआहे. जेव्हा कोरोना व्हायरस संपेल,तेव्हाच हात मिळवा आणि मिठी मारा.’

 

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येकजण हे टाळण्यासाठी उपायांचा अवलंब करण्यात गुंतला आहे. भारतात २८ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. त्यापैकी काही जण बरे झाले आहेत. त्यामध्ये १६ परदेशी आणि ९ भारतीय आहेत.

 

 

सलमान खान आजकाल त्याच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा, दिशा पाटनी सलमान खानसह महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. काही काळापूर्वी सलमान खानचा ‘दबंग ३’ रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.