Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाउनमध्ये ६० दिवसानंतर आपल्या पालकांना भेटण्यासाठी सलमानने दिली मुंबईला भेट

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातच कैद झाला आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून सध्या दूर राहत आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान हा देखील आहे, जो आपल्या आईवडिलांपासून दूर पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. सुमारे ६० दिवसानंतर, सलमान खानने अलीकडेच वडील सलीम खान आणि आई सल्मा यांची भेट घेतली.

गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खान आपले वडील सलीम खान यांची आठवण करीत होता. स्पॉटबॉयच्या अहवालानुसार सलमान खान मंगळवारी वांद्रे येथील त्यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आला. येथे आल्यानंतर त्याने आपले वडील सलीम खान आणि आई सल्मा यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, येथील परिस्थितीची माहिती घेतली आणि मग तो पनवेलमधल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये परत आला. यासाठी त्याने प्रशासनाकडून खास परवानगी घेतली होती आणि यावेळी त्यांनी सोशल डिस्टंन्सिंग देखील राखले.

Salman Khan singing with father Salim Khan is the latest viral ...

सलमान खानने नुकतेच आपले वडील एकटे असल्याने आपल्याला त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाटत असल्याचे सांगितले होते. सलमान गेले काही दिवस पनवेल येथील आपल्या फार्म हाऊसमध्येच थांबला आहे. येथे त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता, तिचा नवरा आयुष शर्मा आणि त्यांची मुलेही आहेत. सलमानचे काही जवळचे मित्रही या फार्म हाऊसमध्ये त्याच्या बरोबर राहत आहेत.

यामध्ये जॅकलिन फर्नांडिज, युलिया वंतूर, पुतण्या निर्वाणा खान आदींचा समावेश आहे. लॉकडाउन सुरु होण्यापूर्वी सलमान काही कामानिमित्त आपल्या फार्म हाऊसमध्ये आला होता. मात्र देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यमुळे तो तिथेच अडकला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.