Take a fresh look at your lifestyle.

सैराट नंतर ‘या’ मराठी चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक,सलमान साकारणार ही भूमिका ?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक समीकरणेच ‘सैराट’ या चित्रपटाने अक्षरशः बदलून टाकली आहेत. बॉक्स ऑफिसवसुद्धा प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या या मराठी चित्रपटाचा हिंदीमध्ये धडक या नावाने रिमेक करण्यात आला. आता सैराट पाठोपाठ समस्त मराठी जनतेच्या मनावर आपला उमटविणाऱ्या आणखी एका मराठी चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. हा रिमेक बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार असल्याचे म्हटले जात आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक सलमान खान करणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘मुळशी पॅटर्न’.हा चित्रपट नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या रिमेकमध्ये सलमान सहाय्यक अभिनेत्याची भूमिकाही साकारण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.


View this post on Instagram

 

Subah ki coffee aur sooraj!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Feb 3, 2020 at 9:31pm PST

 

हाती आलेल्या एका वृत्तानुसार या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये याने साकारलेली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका सलमान करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा हा गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्यापही या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे.

जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवूयात या हव्यासापोटी गुन्हेगारीला लागलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा बेतलेली आहे. २०१८ नोव्हेंबर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा सलमान खानसाठी एक खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता.तेव्हाच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचा विचार बोलून दाखविला होता. आता ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक पाहायला मिळणार असल्याने चाहते खुशीत आहेत.