Take a fresh look at your lifestyle.

अर्जुन आणि परिणितीचा ‘संदीप और पिंकी फरार’ : फर्स्ट लूक

पिच्चर अभी बाकी है । अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांनी त्यांच्या आगामी ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटाची पहिली पोस्टर्स शेअर केली आहेत आणि एकमेकांच्या पात्राला त्यांचा “गुन्ह्यातील भागीदार” म्हणून ओळख करून दिली आहे. मात्र, अर्जुनचे नाव पिंकी दहिया असे असून या चित्रपटात परिणीती संदीप कौरची भूमिका साकारत असल्याचे त्यात ट्विस्ट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला आणि दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ही डार्क कॉमेडी 20 मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

अर्जुनने परिणीतीचे कॅरेक्टर पोस्टर “गुन्हेगारीतील माझ्या साथीदाराची ओळख करून देत, दिबाकर बनर्जीच्या संदीप और पिंकी फारार मधील संदीप म्हणजे परिणीती चोप्रा चे पोस्टर रिलीज तारखेच्या कॅप्शनसहित पोस्ट केले आहे. हे वॉन्टेड पोस्टर म्हणून डिझाइन केलेले आहे आणि संदीप कौर या नावाने परिणितीचे रंगीबेरंगी स्केच आहे ज्यावर चित्रात शिक्का आहे. या चित्रपटात ती कॉर्पोरेट जगतातील महत्वाकांक्षी मुलीची भूमिका साकारत आहे.

 

 

Comments are closed.

%d bloggers like this: