Take a fresh look at your lifestyle.

जाणून घ्या तुरुंगात कमावलेल्या पैशांचं संजय दत्तने काय केलं..

0

चंदेरी दुनिया | सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याचा आगामी सिनेमा पानिपतचं प्रमोशन करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो ‘कपिल शर्मा शो’मध्ये गेला होता. यावेळी त्याने स्ट्रगल, तुरुंगातील दिवस यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

यात संजयने तुरुंगात कमावलेल्या पैशांचं काय केलं याबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसतो. शोमध्ये कपिलने संजयला प्रश्न विचारला की, तुरुंगात रेडिओवर प्रोग्राम सुरू केला आणि फर्नीचरही तयार केलं. एवढं नाही तर कागदाचे लिफाफेही तू तयार करायचास. या सर्व गोष्टी तू किती वेळात शिकलास..

या प्रश्नाचं उत्तर देताना संजय म्हणाला की, ‘या सर्व गोष्टी शिकायला मला फार वेळ लागला. तुरुंगात प्रत्येकालाच काम करावं लागतं. शिक्षा कमी करायची असेल तर तुरुंगात काम करावंच लागतं. मला एक कागदी बॅग तयार करण्याचे १० पैसे मिळायचे. मी ते सारे पैसे जमवले कारण रक्षाबंधनाला मला ते माझ्या बहिणींना द्यायचे होते.’ त्याचं हे वाक्य ऐकून उपस्थित भावुक झाले आणि त्यांनी संजयसाठी टाळ्या वाजवल्या.

शोमध्ये आपल्या स्ट्रगलबद्दल सांगताना संजयने प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं. यावेळी कपिलने त्याच्या ३०८ प्रेयसीबद्दलही प्रश्न विचारला. याचं संजयने फार मजेशीर उत्तर दिलं. पानीपतची को-स्टार क्रिती सेननबद्दल बोलताना संजय म्हणाला की त्याला क्रिती फार आवडली असून ती त्याची ३०९ वी गर्लफ्रेंड होऊ शकते. त्याचं हे उत्तर ऐकून सगळेच हसायला लागले.

Leave a Reply

%d bloggers like this: