Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

संगीत सृष्टीला आणखी एक धक्का; प्रख्यात संतूर वादक पंडित भजन सोपोरी कालवश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 2, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Pandit Bhajan Sopori
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुन्नथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी कोलकाता येथे एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनानंतर आज त्यांच्या पार्थिवावर त्यांचा मुलगा नकुल कुन्नथ याने अंत्य संस्कार केले आणि केके अनंतात विलीन झाले. हे दुःख ओसरतेच तोवर आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे गुरुवारी (दिनांक २ जून २०२२) निधन झाले आहे.

Santoor Maestro and Music Composer Padma Shri Pandit #BhajanSopori Ji passes away in #NewDelhi

Om Shanti 🕉 pic.twitter.com/M5MUKVcbGG

— Kashmiri Pandits United (@kpsunite) June 2, 2022

गुरुग्राममधील फोर्टिस या रुग्णालयात संतूर वादक भजन सोपोरी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद देण्याआधीच त्यांची प्रकृती आणखीच अस्थिर झाली आणि अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त होते. गुरुवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे वृत्त आले होते. यानंतर थेट त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीताची मोठी हानी झाली आहे आणि ही हानी कधीही भरून न काढता येणारी असल्याचे अनेक दिग्गजांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचेही मुंबईत निधन झाले. दरम्यान ते ८४ वर्षांचे होते. ते किडनीशी संबंधित आजाराने त्रासलेले होते. दरम्यान कार्डिअॅक अरेस्टमूळे त्यांचे निधन झालं. यानंतर आता संतूर वादक भजन सोपोरी यांचे निधन चटका लावणारे ठरले आहे. सोपोरी यांना संगीत कला क्षेत्रातील योगदानासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय कालिदास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय ६७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिन २०१६ या दिवशी पंडित भजन सोपोरी यांना जम्मू आणि काश्मीर राज्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोपोरी हे एका प्रतिष्ठित सुफियाना घराण्यातील होते. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर संगीत जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

Tags: death newsmusic industrySad NewsSantoor Maestrotwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group