Take a fresh look at your lifestyle.

हॅरी पॉटरने दिल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । काही वर्षांपूर्वी अमीर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात अमीर बरोबर त्याच्या दोन मुलींची भूमिका अनुक्रमाने फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी वठवली होती.आमिर खानच्या याच ‘दंगल’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या ‘हॅरी पॉटर’याच्या मुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता डॅनियन रॅडक्लिफ उर्फ याने ‘हॅरी पॉटर’ याने आपल्या दंगल गर्ल सान्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डॅनियल आणि सान्या या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या वेळी दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये तिने डॅनियलचा उल्लेख केला होता. या दोघांच्या मैत्रीच्या प्रत्यय पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना आला आहे. डॅनियलने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून. सान्याला शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ त्याने आपली इन्स्टा स्टोरी म्हणून पोस्ट केला आहे.

डॅनियलने सान्यासाठी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे हा ‘हॅरी पॉटर’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘हॅरी पॉटर’ ही जगातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपट मालिकांपैकी एक आहे. १० वर्षांपूर्वीच या ‘हॅरी पॉटर’ मालिकेतील शेवटचा भाग असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये डॅनियने हॅरी पॉटर ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.ज्याची आजही मुलांसहित मोठ्यांमध्येही लोकप्रियता आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: