Take a fresh look at your lifestyle.

‘या’ आजारामुळे सारा नेहमीच राहिली आहे त्रस्त; साराने स्वतः केला हा खुलासा !

टीम, हॅलो बॉलीवूड । सैफ अली खानची मुलगी मिटवत साराने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सेलिब्रिटी किड असूनही तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. साराचे जुने फोटो पाहून ती भविष्यात ग्लॅमरस अभिनेत्री होईल असं कोणालाच वाटलं नसेल. पण कठोर मेहनत आणि चिकाटीने साराने हे शक्य केलं. करण जोहरच्या चॅट शोमध्ये साराने तिच्या आजाराविषयी खुलासा केला.

पीसीओडी (PCOD, ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज’) आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिला वजन कमी करणं शक्य होत नव्हतं. हा आजार तिला अजूनही असल्याचं साराने सांगितलं. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना साराचं वजन ९६ किलो इतकं होतं. अमेरिकेत पुढील शिक्षण घेत असतानाच साराने तिचं वजन कमी केलं. वर्कआऊट आणि पौष्टिक आहार खाऊन तिने वाढलेलं वजन नियंत्रणात आणलं. चालणे, सायकल चालवणे, ट्रेडमिलवर धावणे याप्रकारचे व्यायाम तिने केले.

तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, वजन कमी केल्यानंतर सारा जेव्हा भारतात परतली तेव्हा तिची आई अमृता सिंगसुद्धा तिला ओळखू शकली नव्हती. साराच्या सुटकेसवरून अमृताने तिला ओळखलं आणि तिला पाहताच अमृता थक्क झाली. तब्बल ३० किलो वजन तिने कमी केलं होतं. सारा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे जुने फोटो, व्हिडीओ अजूनही पोस्ट करत असते. वजन नियंत्रणात आणण्याचा तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय यात शंका नाही.

Comments are closed.

%d bloggers like this: