Take a fresh look at your lifestyle.

वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरातून रिपोर्टिंग करत व्हिडिओमध्ये साराने दाखविले हे दृश्य,म्हणाली…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । सारा अली खान आजकाल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे.सारा अली खान बनारसमध्ये तिच्या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. अलीकडे, सारा अली खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सारा अली खान बनारसच्या प्रसिद्ध विश्वनाथ मंदिरातून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. सारा मंदिराशेजारील रस्त्यावर फिरताना दिसली आहे आणि तिथल्या प्रसिद्ध वस्तू तिच्या चाहत्यांनाही दाखवत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

साराने तिच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात फुलांचा हार घाललेला दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नमस्कार प्रेक्षकांनो, बनारसच्या रस्त्यांवरून … किती छान दिवस आहे. कमी पैशात तुम्हाला जास्त मजा येऊ शकते. जर तुम्ही बनारसमध्ये असाल तर.” साराच्या या व्हिडिओवर चाहते खूप रिएक्ट करत आहेत आणि त्यांचा अभिप्रायही देत ​​आहेत.

सारा अली खान नुकतेच ‘लव आज कल २’ चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन देखील मुख्य भूमिकेत होता. व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमल दाखवली नाही. याशिवाय सारा अली खान लवकरच ‘कुली नंबर वन’ आणि ‘अतरंगी रे’मध्येही दिसणार आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: