Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन कडून अभिनेत्री सारा अली खान झाली ट्रोल;जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने नुकतेच अभिनेत्री सारा अली खानला ट्रोल केले आहे. वास्तविक, वरुणने साराच्या अलीकडेच शेअर केलेल्या फोटोवर कमेंट केली आहे. ही कमेंट साराच्या ग्रेजुएशनच्या दिवसांतली आहे. साराने मंगळवारी इन्स्टाग्रामवर तिच्या ग्रेजुएशन दिवसांतले बरेच फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री सारा अली खान ४ वर्षांपूर्वीच कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. तिची ही छायाचित्रे वरुणने धवनने शोधून काढली आहेत.

 

वरुणने यावर कमेंट करताना लिहिले की,’ तुझे आतापर्यंतचे सर्वात चांगले शेअर केलेले छायाचित्र.’ वरुणच्या या कमेंटवर सुमारे ११ हजार लाईक्स आल्या आहेत. साराची ही छायाचित्रे शेअर करताना फोटोच्या केप्शनमध्ये तिने कॅप्शन लिहिले,” १९ मे २०१६ रोजी… कधीकधी असे वाटते की तो एक क्षण होता आणि कधीकधी ते एका वेगळ्या जगासारखे भासते. या कॅप्शनसह साराने हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

 


View this post on Instagram

 

Sex on fire 🔥

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on May 19, 2020 at 7:57am PDT

 

वरुणने त्याचा एक मोनोक्रोम फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. फोटोमध्ये वरुण पांढर्‍या टी-शर्टमध्ये दिसला आहे आणि त्याने त्यावर जॅकेट घातलेले आहे. या फोटोमध्ये वरुण खूपच हँडसम दिसत आहे. या अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांमध्ये कुली नंबर १ बद्दल बरीच चर्चा आहे. हा चित्रपट गोविंदन या साऊथ इंडिअन मूव्हीचा रिमेक आहे ज्यामध्ये सारा अली खान करिश्मा कपूरची भूमिका साकारत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.