Take a fresh look at your lifestyle.

सेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं? तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर …

0

चंदेरी दुनिया । अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. पिंक, बेबी आणि नाम शबाना या सारख्या चित्रपटांमध्ये तिने धाडसी भूमिका साकारल्या आहेत. तापसी ही खऱ्या आयुष्यातही बेधडक आणि हजरजबाबी आहे. नुकतेच पार पडलेल्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट’ या कार्यक्रमात तिने पुन्हा हे सिद्ध केलं आहे.

या कार्यक्रमात तापसलीला विचारण्यात आले की, ‘वाईट सेक्स आणि खूप सारं प्रेम किंवा चांगला सेक्स आणि अजिबात प्रेम नाही. या दोघांमधून तू काय निवडशील?’ यावर ती म्हणाली, ‘माझ्यासाठी सेक्स आणि आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम असेल तर सेक्स चांगलाच होईल. नाही तर माझ्याकडून ते होणार नाही. याबाबतीत तुम्ही मला ओल्ड स्कुल म्हणाला तरी चालेल’, असं तापसी म्हणाली आहे.

आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगताना ती म्हणाली की, ‘मी नववीत असताना मला एक मुलगा आवडत होता. आम्ही भेटायचो, बोलायचो. मात्र काही दिवसानंतर अचानक तो मला भेटायचा बंद झाला. मला कळलं नाही, नेमकं झालं तरी काय? काही दिवसाने त्याच्या एका मित्राने मला त्याचा मेसेज दिला. त्याने सांगितलं की, माजी दहावी बोर्डाची परीक्षा आहे. मला माझ्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपण आता हे सर्व इथेच थांबवू. तेव्हा मला कळलं नाही, मी कुठे त्याला डिस्टर्ब करते. तेव्हा तर मोबाईलही नव्हते. मी माझ्या घराच्या मागे असलेल्या पीसीओ वरून त्याला कॉल केला. त्याने फोन उचलला नाही. त्यावेळी मी ठरवलं… यापुढे कोणता ही मुलगा अशा प्रकारे माझं मन दुखवू शकत नाही.’ असा खुलासा तापसीने केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: