Take a fresh look at your lifestyle.

विराट, हृतिकसह ‘हे’आहेत आशियातील टॉप १० सेक्सी हिरो..

0

चंदेरी दुनिया | ब्रिटिश वृत्तपत्र ‘इस्टर्न आय’ ने आशियातील सर्वोत्तम सेक्सी पुरुषांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला २०१९ आणि या दशकाचा सर्वात सेक्सीएस्ट पुरुष म्हणून घोषित करण्यात आले आहे. फक्त हृतिकच नाही तर भारतातील अनेक स्टारची नावं या यादीत आहेत.

शाहिद कपूरला २०१७ मध्ये आशियातील सर्वात सेक्सी पुरूष म्हणून घोषित करण्यात आले होते. या वर्षी तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. कबीर सिंग या चित्रपटाद्वारे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली.


छोट्या पडद्यावरील अभिनेता विवियन डिसेना सेक्सी आशियाई पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. विवियनने ‘शक्ती-अस्तित्व अनुभूती’, ‘मधुबाला- एक इश्क एक जुनून’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘इश्क में मरजावां’ आणि ‘कसम से’ या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.


सध्या बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता टायगर श्रॉफ या यादीत चौथ्या स्थानावर आहे.


मुळचा पाकिस्तानी असलेला ब्रिटीश पॉप स्टार जायन मलिक यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.


टीव्ही स्टार हर्षद चोप्राने या यादीत सहावे स्थान मिळवले आहे. हर्षदने ‘बेपनाह’, ‘हमसफर’, ‘किस देश में है मेरा दिल’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.


पाकिस्तानचा यशस्वी अभिनेता बिलाल अशरफचा या यादीत सातवा क्रमांक लागतो. बिलाल हा पाकिस्तानमधील सर्वात जास्त मानधन घेणारा आभिनेता आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेता मोहसिन खान हा सर्वात सेक्सी आशियाई पुरुषांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. त्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘ड्रीम गर्ल’ यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत नवव्या स्थानावर आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास या यादित १० व्या स्थानावर आहे. बाहूबली या चित्रपटातून जगभर प्रसिद्ध झालेल्या प्रभासचा साहो चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: