Take a fresh look at your lifestyle.

शबाना आझमी यांना अखेर हॉस्पिटल मधून मिळाला डिस्चार्ज; बाहेर येऊन म्हणाल्या…

टीम, हॅलो बॉलीवूड । बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शबाना रूग्णालयातून मुक्तीनंतर घरी परतली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. शबाना यांनी लिहिले की, “ज्यांनी माझ्या प्रकृती सुधारण्याच्या दृष्टीने प्रार्थना केली त्यांचे आभार. आता मी परतले आहे. त्यांनी उद्योजक मुकेश अंबानी यांची पत्नी टीना अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे, चांगली काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

   शबाना आझमी यांनी लिहिले, “टीना अंबानी आणि कोकिलाबेन हॉस्पिटलची टीम, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांनी चांगली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांची आभारी आहे.” टीना अंबानी या एकेकाळी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होत्या आणि सध्या मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या अध्यक्षा आहेत. शबानाच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी ट्विटरवरुन त्यांचे अभिनंदन केले आहे.

   8 जानेवारी रोजी आझमी गंभीर जखमी झाल्या होत्या. शुक्रवारी 31 जानेवारीला दोन आठवड्यांहून अधिक काळ रुग्णालयात राहिल्यानंतर त्या घरी परतल्या आहेत. त्यांच्या ट्विट वर बऱ्याच जणांचे वेगवेगळे रिप्लाय आले आहेत. बऱ्याच कलाकारांनीही त्यांच्या पोस्ट वर प्रतिक्रिया दिली आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: