Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी; जावेद अख्तर थोडक्यात बचावले

मुंबई । पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ज्येष्ठ आणि संवेदनशील अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला ट्रक धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. त्यांचा एक फोटोही समोर आला असून त्यात त्यांच्या चेहऱ्याला मार बसल्याचे दिसत आहे. जावेद अख्तरही कार मध्ये होते त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

आज पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर हा अपघात झाला आहे. अभिनेत्री शबाना आझमी जखमी झाल्या आहेत. आझमी यांच्या कारची ट्रकला धडकल्याने हा अपघात घडला. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला आहे.

घटनास्थळावर पोलिसांनी तातडीने धाव घेत शबाना आझमी यांनी मदत पुरवली. शबाना आझमी यांना जखमी अवस्थेत पनवलेच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आझमी यांच्या MH02 CZ 5385 या कारला भीषण अपघात झाला नसून कारचा एक भाग चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातातून शबाना आझमा थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्याला जखम झाल्याचे दिसत आहे.

Screen Shot 2020-01-18 at 5.47.15 PMsabana_750_011820052458shabana_4_011820052458

Comments are closed.

%d bloggers like this: