Take a fresh look at your lifestyle.

शबाना आझमीच्या अपघाताचा फोटो व्हायरल होण्यावर दिली प्रतिक्रिया म्हणाली,”माझे कुटुंब नाराज आहे…”

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांचे १८ जानेवारीला खालापूर टोल प्लाझाजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात जखमी अभिनेत्रीला नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. शबाना आझमीच्या अपघाताचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीची प्रतिक्रिया आली आहे. नुकतच शबाना आझमीने एका मुलाखतीत सांगितले की, अपघाती फोटो व्हायरल झाल्यामुळे तिचे कुटुंब खुश नाहीये.

शबाना आझमीच्या अपघाताच्या त्या छायाचित्रांमधे ती रक्ताने लोटलेल्या अवस्थेत पडली होती. अभिनेत्रीची ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार एका मुलाखती दरम्यान शबाना आझमी यांनी सांगितले की ही छायाचित्रे व्हायरल होणे हे तिच्या कुटुंबीयांना आवडले नाही. अभिनेत्रीने सांगितले की जेव्हा ती रुग्णालयात होती आणि हळूहळू बरे होत होती तेव्हा आपल्याला या छायाचित्रांची कल्पना नव्हती.

अभिनेत्री शबाना आझमी ट्विटरने पुढे असे उघड केले की तिचे कुटुंबीय यामुळे नाखूष आहेत. त्याच वेळी,अपघाता दरम्यान शबाना आझमी यांचे पती आणि लेखक जावेद अख्तर देखील त्यांच्यासोबत कारमध्ये उपस्थित होते. अभिनेत्री शबाना आझमी लवकरच ‘शीर-कोरमा’ चित्रपटात दिसणार आहे.

Comments are closed.