Take a fresh look at your lifestyle.

शाहरुखची बहीण नूरजहाँ यांचे पाकिस्तानमध्ये निधन

टीम, हॅलो बॉलीवूड । बऱ्याच लोकांना हे माहिती न्हवतं कि सुपरस्टार शाहरुखचे काही चुलत नातेवाईक पाकिस्तान मध्ये राहतात. शाहरुख खानची बहिण नूर जहां यांचे मंगळवारी पाकिस्तानातील पेशावर येथे निधन झाले. त्या शाहरुखच्या चुलत बहिण होत्या. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नूर गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली.

नूरजहाँ यांच्या मृत्यूनंतर शाहरुखच्या पाकिस्तान संबंधांवर प्रकाश पडला असून, आता या घटनेनंतर या विषयावर बऱ्याच चर्चा सोशल मीडिया वर होत आहेत. शाहरुख बहिणीला बघायला गेला कि नाही याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाहीये.

कोण होत्या नूर जहां?

नूर जहां शाहरुखच्या चुलत काकांची मुलगी होती. त्या पेशावर येथील मोहल्ला शाह वली कतल परिसरात राहत होत्या. त्या पाकिस्तानातील राजकारणात देखील सक्रिय होत्या. तसेच नूर जहां शाहरुख खानला भेटण्यासाठी दोनदा भारतात देखील आल्या होत्या. शाहरुख आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पेशावर येत जात असे.

Screen Shot 2020-01-29 at 8.09.25 PM