Take a fresh look at your lifestyle.

प्रिया प्रकाशला आता ‘शिल्पा शेट्टीची’ टक्कर डोळा मारतानाचा व्हिडीओ केला शेअर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा डोळा मारतानाचा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला होता की, रातोरात इंटरनेट सेंसेशन बनली होती. गोळी झाडत डोळा मारतानाचा तिचा अंदाज लोकांना खूप आवडला होता. मात्र तिला आता शिल्पा शेट्टीने टक्कर दिली आहे.

शिल्पाने तिचा डोळा मारतानाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. शिल्पाचा हा नवीन व्हिडीओ आहे. परंतु अदाज मात्र तोच आहे डोळ्यांनी गोळी मारण्याचा. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

शिल्पानं टिकटॉक अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये शिल्पा म्हणते, “मीही दबंग. तुम्हाला कोणता लुक जास्त आवडला.” शिल्पाच्या या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. लाखो चाहत्यांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.