Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! व्हिडीओ शूट करत अभिनेत्रीची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोरंजन क्षेत्रात नेहमी काहीतरी धक्कादायक घटना समोर येत असतात. आजपर्यँत या क्षेत्रात अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र दाक्षिणात्य अभिनेत्री चंदना हिने व्हिडीओ शूट करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री चंदना हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ शूट केला आहे. जयंत तिने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. तिने तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने तिची फसवणूक केली आहे असे तिने या व्हिडिओत सांगितले आहे.

चंदनाने व्हिडिओमध्ये केलेल्या आरोपानुसार तिच्या प्रियकरावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार २९ वर्षीय चंदनाने आत्महत्या करण्यापूर्वी जो व्हिडीओ केला आहे त्यामध्ये तिचा प्रियकर दिनेश याच्यावर तिची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्याने तिचे शारीरिक, मानसिक शोषण केल्याचे आरोप तिने केले आहेत. तिने २८ मे रोजी हा व्हिडीओ शूट करून आत्महत्या केली होती. जो १ जून रोजी समोर आला आहे.

दरम्यान तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजल्यावर लगेच तिचा प्रियकर तिला रुग्णालयात घेऊन गेला पण तिथे पोहोचताच तिचा मृत्यू झाला. दिनेश आणि चंदना गेल्या पाच वर्षांपासून नात्यात होते. या दोघांच्या नात्याबद्दल घरच्यांना माहिती होती मात्र लग्नाच्या बोलणीसाठी गेले असता दिनेशच्या घरच्यांनी चंदनाच्या घरच्यांना वाईट वागणूक देत लग्नाला नकार दिला. म्हणूनच चंदनाने आत्महत्या केली. या सर्व घटनांमुळे पोलिसांच्या भीतीने दिनेशने रुग्णालयातून पळ काढला. त्याच्यावर तसेच त्याच्या कुटुंबियांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.