Take a fresh look at your lifestyle.

तरच सिद्धार्थ शुक्ला दिसू शकेल सलमान खानसमवेत ‘राधे’ मध्ये !

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या आपल्या ‘राधे युअर मोस्ट वॉन्टेड हिरो’ चित्रपटाची तयारी करत आहे. चित्रपटाचे शूटिंग चालू झाले असून यंदा ईदला प्रदर्शित होणार आहे. ‘बिग बॉस १३’ चा विजेता ठरलेला सिद्धार्थ शुक्ला देखील यात दिसू शकतो, अशी चर्चा होती. तथापि, ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड हिरो’ या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले आहे की, चित्रपटाचे शूटिंग ४ ते ५ दिवसांत संपेल, त्यामुळे सिद्धार्थ शुक्ला सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा भाग नाही होऊ शकणार.

सलमान खानच्या या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने चित्रपटाविषयी माहिती देताना सांगितले की, “राधेचे शूटिंग चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल. अशा परिस्थितीत आम्ही त्याला सहभागी होण्यास कसे सांगू शकतो. अशा बर्‍याच अफवा आहेत, ज्या योग्य नाहीत. ” सलमान खानच्या या चित्रपटात सिद्धार्थ शुक्लाची अनुपस्थिती त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच दुःखद आहे. पण ‘बिग बॉस १३’ जिंकल्यानंतरही सिद्धार्थ शुक्ला सतत चर्चेत राहतोय. त्याचे फोटो किंवा व्हिडिओ दोन्हीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

सलमान खानच्या चित्रपटाविषयी बोलतांना त्याचा ‘राधे: युअर मोस्ट वांटेड हिरो’ ईदच्या खास निमित्ताने रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान सोबत रणदीप हूडा आणि अभिनेत्री दिशा पटानी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शनही दबंग ३ प्रमाणे प्रभुदेवा हेच करणार आहेत. यापूर्वी सलमान खान च्या दबंग ३ ने बॉक्स ऑफिसवर धडक दिली होती, यात किचा सुदीप, सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर मुख्य भूमिकेत दिसले होते.