Take a fresh look at your lifestyle.

साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘थडम’ च्या हिंदी रिमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार डबल भूमिका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये अनेक अ‍ॅक्शन पॅक सिनेमे दिले आहेत पण आता तो साऊथच्या एका सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करणार आहे. होय, साऊथचा सुपरहिट फिल्म ‘थडम’ च्या रीमेकमध्ये सिड डबल रोल करणार आहे.सिद्धार्थ सध्या शेरशाह चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि योगायोगाने या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. ‘थडम’चा हिंदी रिमेक टी सीरिज़चा मालक भूषण कुमार आणि निर्माता मुराद खेताणी संयुक्तपणे तयार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धार्थने आपल्या चाहत्यांना हि बातमी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सांगितली आहे. येथे त्याने लिहिले- “दुहेरी संकट ! भूषण कुमार, मुराद खेताणी आणि वर्धन केतकर यांच्यासोबत या जबरदस्त मनोरंजक थ्रीलरचा भाग बनणे आनंददायक आहे.

 

या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल आणि २० नोव्हेंबर २०२० रोजी म्हणजे यंदाच्या वर्षी रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.

चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नसून सिद्धार्थसोबत कोणती अभिनेत्री दिसणार आहे, हेदेखील समोर आलेले नाहीये. सिड सध्या त्याच्या आगामी ‘शेरशाह’ चित्रपटावर काम करत आहे, ज्यामध्ये तो कारगिल युद्धावेळी शहीद झालेल्या भारतीय लष्करातील कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातही सिद्धार्थ डबल रोल करताना दिसणार आहे. या चित्रपटात सिद दिवंगत विक्रम बत्रासमवेत त्याच्या भावाची भूमिकाही साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला की ही माझी पहिली बायोपिक आहे आणि मी यासाठी खूप उत्साही आहे. हा चित्रपट मुख्यतः कॅप्टन विक्रमचा आहे. मी त्याच्या भावाची व्यक्तिरेखादेखील साकारणार आहे आणि या दुहेरी भूमिकेतून कसे वागायचे, आम्ही सध्या यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहीद कॅप्टन विक्रमबाबत सिद्धार्थ म्हणाले की त्याने सैन्यातील अनेक लोकांवर प्रभाव पाडला आहे. मी असे नाही म्हणत की ती एक व्यक्ती आहे जी सर्वांना माहित आहे, परंतु मला वाटते की त्याविषयी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. मला त्याची हि कथा खूप आकर्षक आणि प्रभावी वाटली.

साऊथच्या ‘थडम’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्यात अरुण विजयने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एक रोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर असून कथा रहस्यमयी मर्डर भोवती फिरत आहे. हे प्रकरण तेव्हा अधिकच गुंतत जाते, जेव्हा मुख्य संशयिता सारखा दिसणारा आणखी एक जण एन्ट्री घेतो.