Take a fresh look at your lifestyle.

सोनाक्षीला बुलेट राईड पडली महाग, झाली ‘या’साठी ट्रोल !

सोशल कट्टा । बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर बर्‍याच वेळा ट्रोल झाली आहे. कधीकधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी स्टेटमेंटमुळे ट्रोलच्या निशाण्याखाली येते. यावेळी मुंबईच्या रस्त्यावर बुलेट बाईक चालवल्यामुळे सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. सोनाक्षी सिन्हाचा दुचाकी चालविण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

   सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री करीना कपूरच्या रेडिओ ‘शो, व्हॉट वूमन वॉन्ट’ याला बुलेट बाइकवरून सेटवर आली. सोनाक्षी सिन्हाचा दुचाकी चालविण्याचा व्हिडिओ अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हायरलभयानीने शेअर केला आहे. सोनाक्षी सिन्हाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनि तिला तिच्या व्हीआयपी कल्चरसाठी ट्रोल केले.

   शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा दुचाकी चालवत आहेत, तर तिचे अंगरक्षक आणि सर्व मीडियाकर्मी सोनाक्षीला फॉलो करीत आहेत. यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या लोकांना ट्रॅफिक जाम आणि अडचणींचा सामना करावा लागला आहे. व्हिडिओमध्ये, सोनाक्षीचे अंगरक्षक तिच्या जवळ येणाऱ्या वाहन चालकांना दूर राहण्याचे निर्देश देताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हाच्या या व्हीआयपी कल्चरमुळे सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.