Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची एंगेजमेंट झाली.. पण तो कोण.? उत्सुकता कायम

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीचा साखरपुडा झाला आहे हि बातमी पसरताच सोशल मीडियावर नुसता प्रश्नांचा भडीमार सुरु आहे. त्याच झालं काय.. सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून काही फोटो पोस्ट करीत आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या दिवसाबद्दल माहिती दिली आहे. सोनाक्षीचा चक्क साखरपुडा झालाय आणि तोही गुपचूप. आता म्हणा गुपचूप लग्न, साखरपुडा हे काय नवीन राहिलेलं नाही. पण सोनाक्षीने फोटो पोस्ट करूनही तिचा तो कोण आहे..? याबाबत चाहत्यांची उत्सुकता ताणून धरली आहे. तिच्या बोटातली डायमंड रिंग जेव्हढी चमकतेय चाहत्यांचे प्रश्न तेव्हडेच वाढले आहेत. हा लकी माणूस आहे तरी कोण याबाबत नुसती चर्चा सुरु आहे.

सोनाक्षी सिन्हाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक भारदस्त व्यक्ती दिसतोय पण त्याचा चेहरा दिसत नाही. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या बोटात डायमंड रिंग दिसतेय आणि तीच कॅप्शन वाचून कुणालाही तिने साखरपुडा केलाय हे लक्षात येईल. पण न दिसणाऱ्या त्या व्यक्तीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. सोनाक्षीची अंगठी, फोटोतला लकी मॅन आणि या फोटोंचं कॅप्शन या सर्व गोष्टींमुळे ती लवकरच चाहत्यांना सॉलिड आनंदाची बातमी देणार अशी चर्चा रंगली आहे.

तूर्तास सर्वत्र सोनाक्षीने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी साखरपुडा केला असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कारण सोनाक्षीने तिच्या पोस्ट केलेल्या तीन फोटोसह ०एकच कॅप्शन दिलं आहे. ती लिहितेय कि, ”माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये”. यातील एका फोटोमध्ये तिने त्या व्यक्तीचा हात धरला आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि तिसऱ्या फोटोंमध्ये ती तिच्या बोटातील अंगठी दाखवतेय.

शिवाय कॅप्शनच्या शेवटी EZI लिहिल्यामुळे ‘EZI म्हणजे झहीर इक्बाल का?’, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. सोनाक्षी आणि झहीर या दोघांनीही सलमानच्या प्रोजेक्टमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनाक्षीने 2020 मध्ये ‘दबंग’ तर झहीरने 2019 मध्ये ‘नोटबुक’ या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.