Take a fresh look at your lifestyle.

काय झालं, कुठं झालं, कसं झालं..? सोनाली कुलकर्णीचं पुन्हा एकदा लग्न झालं; पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मोहक अदा आणि मधाळ हास्याने महाराष्ट्राची अप्सरा अशी ख्याती मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. कधी नव्या लूकमुळे, कधी नव्या प्रोजेक्टमुळे तर कधी लग्नाच्या बातमीमुळे सोनाली कायम चर्चेत राहिली आहे. गेल्या वर्षी ७ मे २०२१ रोजी सोनाली कुलकर्णीने कोरोनाच्या काळात कुणाल बेनोडेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली. अत्यंत सध्या पद्धतीने आणि अगदी ऑनलाईन मित्र मंडळींच्या हजेरीत सोनालीने आपले लग्न उरकले. यानंतर सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान आता ऍनिव्हर्सरीनिमित्त तिने पुन्हा एकदा कुणालसोबतच लग्न केले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

ती पुन्हा लग्न करणार असल्याची काही दिवसापासून फक्त चर्चा होती. पण हे लग्न कधी होणार, कुठे होणार, कसे होणार याबाबत अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असताना सोनालीची प्रश्नांमधून सुटका कशी होईल. म्हणूनच आता अखेर यावर सोनालीने स्वतःच एक पोस्ट करून उत्तर दिले आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनाली आणि कुणाल यांची नाव लिहिलेली आहेत. यासोबत तिने एक हटके कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले कि, “pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना travel करता नाही आलं. Zoom call वरून साक्षीदार झाले.’

पूढे तीने लिहिले आहे कि, ‘पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू. अश्या आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं. यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सहकुटुंब – सहपरिवार – ठरल्याप्रमाणे – संपूर्ण विधीपूर्वक – मराठमोळ्या पद्धतीने – अगदी स्वप्नवत – लग्न केलं. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.