Take a fresh look at your lifestyle.

सोनाली कुलकर्णी पुन्हा लग्न करणार..?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अख्ख्या महाराष्ट्राच्या दिलावर राज्य करणारी मराठमोळी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. गतवर्षी ७ मे २०२१ रोजी कोरोनाच्या काळात चालू लोकडाऊनमध्ये सोनालीने कुणाल बेनोडेकर यांच्याशी लग्न केले. हे लग्न परदेशात पार पडलं.

अगदी ऑनलाईन मान्यवरांची उपस्थिती घेऊन सध्या सुध्या पद्धतीने सोनाली आणि कुणालने लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल देखील झाले होते. दरम्यान अनेक तरुण पुरुष चाहत्यांच्या दिलाचा चक्काचूर झाला होता. यंदा ७ मे रोजी सोनालीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त ही जोडी पुन्हा धुमधडाक्यात लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली कुलकर्णी हिने ७ मे २०२१ रोजी दुबईमध्ये कुणाल बेनोदेकर यांच्याशी लॉकडाऊनमध्ये लग्न केले होते. कोरोनाचा काळ असल्यामूळे साहजिकच त्यांना आपले लग्न सध्या पद्धतीने आणि घरच्या मंडळींच्या उपस्थितीत करावे लागले होते. दरम्यान त्यांच्या लग्नासाठी अन्य नातेवाईक आणि मित्र परिवाराला ते आमंत्रित करू शकले नाहीत. यामुळे सोनाली आता तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तिच्या सर्व कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न करणार आहे अशा चर्चांनी जोर धरला आहे.

सोनालीने गतवर्षी रजिस्टर पद्धतीने म्हणजे लग्न केले होते. पण आता सोनाली काही ऐकणार नाही. कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यामुळे आता पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने सोनाली आणि कुणाल लग्न करणार आहे अशी चर्चा आहे. हे लग्न लंडनमध्ये ७ मे २०२२ रोजी अर्थात त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी होणार असल्याचे ई टाईम्सच्या सूत्रांनी सांगितले आहे.

सोनाली सध्यातरी मुंबईत आहे. पण लवकरच ती लंडनला रवाना होणार आहे अशी माहिती मिळतेय. शिवाय हे जोडपे त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे आणि त्यांच्या भव्य विवाह सोहळ्याच्या जय्यत तयारीत व्यस्त असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. अद्याप हि केवळ चर्चा असून यावर सोनाली कुलकर्णीकडून अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.