Take a fresh look at your lifestyle.

सोनम कपूरला कॅब ड्रायव्हरसोबत आला भयानक अनुभव !! थरथरत असल्याचे केले ट्विट

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन । अभिनेत्री सोनम कपूर आहुजाने नुकतच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सोनमने आपल्यासोबत झालेली भयावह घटना शेअर केलीये. ही घटना तिच्यासोबत लंडनच्या एका कॅबमध्ये घडली. या घटनेमुळे ती पूर्णतः हादरुन गेलीये, असं सोनमने म्हटलंय.

ती लिहिते कि, “मला लंडनच्या उबेर कॅबमध्ये सर्वात भयावह अनुभव आला. प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक आणि पब्लिक कॅब हाच येथे सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. मी पूर्णतः हादरलेय. कृपया सर्वांनी सतर्क राहावं” असं ट्विट सोनम कपूरने केलं. तिच्या या ट्विटनंतर नेमकं सोनमसोबत काय घडलंय हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. तिने आपल्या ट्विटमध्ये घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली नव्हती. या घटनेचा उल्लेख करताना इतरांनीही सतर्क राहावं असं आवाहन सोनमने केलंय.

अभिनेत्री सोनम कपूर सध्या पती आनंद आहूजासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. यादरम्यान तिने अनेकदा रोमँटिक फोटो शेअर केले. अखेर लंडनमध्येच राहणाऱ्या एका महिलेने स्वतःसोबत काहीही वाईट घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सोनमला नेमकं काय घडलंय याबबात विचारणा केली. तिला उत्तर देताना सोनम म्हणाली, “ड्रायव्हर बहुदा मानसिकरित्या अस्थिर होता आणि माझ्यावर जोरजोरात ओरडत होता. मी त्यामुळे पूर्णतः हादरुन गेले होते”

दरम्यान,सोनमच्या ट्विटची उबेर कंपनीने दखल घेतली असून ड्रायव्हरवर लवकरच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.