Take a fresh look at your lifestyle.

दीपिका पदुकोणने तिच्या Ex बॉयफ्रेंडबद्दल केले ‘हे’ खुलासे

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अभिनेत्री दीपिका पादुकोणनं आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींवर खुलासा केला आहे. आपल्या Ex. बॉयफ्रेंडबद्दल तिने खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनं आपल्या खाजगी आयुष्याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

माझा सेक्सचा अर्थ फक्त फिजीकल अटॅंचमेंट नाहीये. यात भावनाही जोडल्या जातात. मी कधीच कोणाला चीट केलं नाही. जर मला कोण चीट करत असेल तर मी का त्या रिलेशनशिपमध्ये का राहू. यापेक्षा सिंगल राहिलेलं चांगलं. परंतु कोणी माझ्यासारखा विचार करत नाही. मी आधीच खूप काही सहन केलं आहे. असं दीपिका म्हणाली.

मी इतकी मुर्ख होते की, मी त्याला दुसरी संधीही दिली. कारण त्यानं माझ्याकडे भीक मागितली होती आणि गयावया केली होती. मी त्याला रंगेहाथ पकडलं होतं. मला त्यातून बाहेर येण्यासाठी वेळ लागला. आता ती नाव बुडून गेली आहे.  असं ती कोणाचं नाव न घेता म्हणाली.