Take a fresh look at your lifestyle.

सुभाष घई यांनी जागवल्या ड्रग्जविरोधी मोहिमेच्या आठवणी

0

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन : सध्या बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. ज्या १२ लोकांना ताब्यात घेण्यात आले त्यात एक आर्यन खानसुद्धा आहे. आर्यन खानला रविवारी अटक करण्यात आली. सध्या एनसीबीच्या कोठडीत असलेल्या सर्वांची चौकशी केली जात आहे. दरम्यान चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी अमली पदार्थविरोधी मोहिमेत सहभागी झालेल्या लोकप्रिय कलाकारांचा एक जुना फोटो ‘कू’ या सोशल मीडिया अॅपवर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सदर फोटोत अभिनेता , अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, मिथुन चक्रवर्ती, शबाना आझमी, आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज दिसत आहेत.
सुभाष यांनी फोटो शेअर करत कॅप्शन दिली आहे, “१९९० साली आम्ही #SayNoToDrugs अशी मोहीम सुरू केली होती. यात गुलशन जितेंदर, विनोद खन्ना, आमिर खान, अमिताभ बच्चन, मिथुन दा, जॅकी, डिंपल, शबाना, टीना खन्ना, पद्मिनी कोल्हापुरे आणि व्हीआयपी यांच्यासह कलाकार सुभाष यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आम्ही अजूनही ड्रग्ज या राक्षसाच्या विरोधात लढत आहोत. देव आमच्या मुलांचे या राक्षसापासून रक्षण करो!”

दरम्यान शाहरुख किंवा त्याची पत्नी गौरी खान यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसताना, अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या समर्थनासाठी हात पुढे केला आहे. यामध्ये सुचित्रा कृष्णमूर्ती, पूजा भट्ट आणि हंसल मेहता यांचा समावेश आहे.