सोशल कट्टा । हॉट अभिनेत्री सनी लिओनी हिने बऱ्याचदा प्रियांका, दीपिका सारख्या टॉपच्या अभिनेत्रींना देखील गुगल सर्च मध्ये मागे टाकलंय. त्यामुळेच तिच्याविषयीची कोणतीही चर्चा चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरते. यामध्येच सध्या सोशल मीडियावर तिच्या पाठीला झालेल्या गंभीर दुखापतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनीची पाठ रक्ताळलेली दिसत आहे. त्यामुळे सनीला नेमकी कसली दुखापत झाली आहे हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अर्थात सनीच्या पाठीला खरोखरची दुखापत झाली नसून एका फोटोशूटमधील हा व्हिडीओ आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिस्ट सनीच्या पाठीवर मेकअप करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा मेकअप अत्यंत सुंदररित्या करण्यात आला असून खरोखरचं सनीला दुखापत झाल्याचा भास होत आहे. या व्हिडिओमध्ये मेकअप आर्टिस्टने सनीच्या पाठीवर आर्टिफिशियल स्किन लावली आहे. तिच्या या व्हिडीओला इन्स्टावर भरपूर हिट्स मिळत आहेत.
पहा व्हिडीओ:
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                    