Take a fresh look at your lifestyle.

सनी लिऑन करतेय समुद्रकिनाऱ्यावर मुले आणि पतीबरोबर मस्ती; पहा फोटो

हॅलो बाॅलिवुड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. सनी नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. आता सनी लिओनीची काही ताजी छायाचित्रे समोर आली आहेत, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती पती डॅनियल बेवर आणि मुलांसमवेत समुद्रकिनारी मस्ती करताना दिसत आहे. फोटोंमध्ये सनी नारंगी रंगाचे आउटफिट परिधान करतांना दिसू शकते. या लूकमध्ये सनी खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तिचा नवरा आणि मुलांसमवेत समुद्रकिनारी.” सनीच्या या फोटो ला 8 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच ,कमेंट्स करून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत.

सनी सध्या पती डॅनियल वेबर आणि मुलांसमवेत अमेरिकेत राहत आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच सनी तिच्या पती डॅनियल आणि मुलांसह अमेरिकेत गेली.