Take a fresh look at your lifestyle.

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकरांना पद्मश्री पुरस्कार !

मराठी सृष्टी । प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पदं पुरस्कार जाहीर झाले. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गायक सुरेश वाडकर यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. संगीतकारांमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. लता दीदी आणि आशाताईंचा आशीर्वादामुळे हे साध्य झाल्याची भावना गायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली आहे. गृहमंत्रालयाकडून फोन द्वारे त्यांना ही माहिती देण्यात आली.

सुरेश वाडकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाणी त्यांनी चित्रपट सृष्टीला दिली. लगी आज सावन की फिर ओ घडी है, मेरी किस्मत तू नही शायद, राम तेरी गंगा मैली हो गई, सपनो मे मिलती है कुडी मेरी सपनो अशी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी वाडकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला दिली. प्रत्येक गणेश उत्सवात आवर्जून लावले जाणारे ओंकार स्वरूपा हे गाणंही त्यांनीच गायलेलं आहे.

हा सागरी किनारा, चिंब पावसानं झालं रान, अग अग पोरी फसलीस ग अशी अनेक सुपरहिट गाणी सुरेश वाडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिली. अर्थात त्यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संगीतकारांच या प्रवासातील महत्व देखील अधोरेखित केले आहे. पद्मश्री, पदमभूषण, पदमविभूषण आणि भारतरत्न असे चार पुरस्कार भारत सरकार तर्फे दरवर्षी देण्यात येतात. पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.