Take a fresh look at your lifestyle.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण: सलमान, करण जोहरसह ‘या’ ८ सेलिब्रिटींविरोधात कोर्टाचा मोठा निर्णय!

मुंबई | सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. पण त्यादरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसानंतर, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये 8 सेलिब्रिटींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वकील सुधीरकुमार ओझा यांची ही याचिका होती.

महत्त्वपूर्ण म्हणजे ओझाने आपल्या तक्रारीत सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्यावर सुशांतच्या आत्महत्येचा आरोप केला.

मुजफ्फरपूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. त्यानी ही याचिका नाकारली. ही बाब त्यांच्या कोर्टाच्या कार्यक्षेत्रबाहेरील असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सुधीर कुमार ओझा यांनी म्हटले ,जिल्हा न्यायालयात मी याला आव्हान देईन . सुशांतच्या निधनानंतर बिहारला वेदना होत आहेत. त्या लोकांना समोर आणा ज्यांनी आमच्या मुलाला एवढ कठीण पाऊल उचलायला लावलं.