Take a fresh look at your lifestyle.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण: इमारतीची CCTV रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येने झालेल्या मृत्यूची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे आणि एका ताज्या अपडेटमध्ये सुशांतच्या निवासस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. सुशांतसिंग राजपूत ज्या इमारतीत राहत होते त्या इमारतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुशांतच्या घरी कोणतेही सीसीटीव्ही लावलेले नाहीत. तसेच अजून फॉरेन्सिक अहवालाची प्रतिक्षा आहे असे अभिषेक त्रिमूखे डीसीपी (झोन आयएक्स), मुंबई पोलिस, यांनी ANI ला दिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुशांतसिंग राजपूत यांचे 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले.

काल, चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना चौकशीत मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. भन्साळींनी सुशांतला आपल्या ‘गोलियां की रास लीला – राम लीला’ या चित्रपटात काम करण्यासाठी संपर्क केला होता. परंतु, सुशांत दुसर्‍या प्रॉडक्शन हाऊसबरोबरच्या करारामध्ये असल्याचे सांगण्यात आले. वांद्रे पोलिस ठाण्यात संजय लीला भन्साळी यांची चौकशी सुमारे दोन तास चालली.