Take a fresh look at your lifestyle.

सुशांतसिंहच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का, ‘छिछोरे’ बघून मुलीची आत्महत्या

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केली. या घटनेला एक महिना उलटून गेला. मात्र, त्याचे चाहते अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. छत्तीसगडच्या भिलाई येथे सुशांतची चाहती असलेल्या मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्याकडे सुसाइड नोट सापडली आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूनं जबरदस्त धक्का बसला होता. तिच्या आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूनं ती खूप दुःखी होती. त्यामुळे तिने आयुष्य संपवलं, असा मजकूर या चिठ्ठीत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं सुशांतसिंहचा ‘छिछोरे’ हा चित्रपटही पाहिला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील हे रायपूरमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना तीन मुलं आहेत. बुधवारी सकाळी तिची आई दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती. घरात मुलगी एकटीच होती. चौकशीत असे समजले की, या मुलीनं आत्महत्येपूर्वी सुशांतचा छिछोरे हा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर तिनं वडिलांसोबत सुशांतसिंह राजपूत आणि छिछोरे चित्रपटाबद्दल चर्चाही केली होती.

काही वेळ मुलीसोबत बसून तिच्या वडिलांनीही चित्रपट पाहिला होता. त्यानंतर वडिलांनी तिला बाजारात सोबत येण्यासाठी विचारणाही केली होती. मात्र, तिनं नकार दिला. संध्याकाळी साधारण पाच वाजताच्या सुमारास वस्तू आणण्यासाठी बाजारात गेले. ते परत आल्यानंतर घरातील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. तिच्या वडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्यांनी धाव घेतली. मुलीच्या गळ्याभोवतीचा फास काढून तिला खाली उतरवलं आणि रुग्णालयात नेलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं

सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर मुलगी घरात त्याच्याच चित्रपटातील गाणी गुणगणायची. ती टीव्हीवर सुशांतसिंह याच्या संदर्भातील बातम्या बघायची. मात्र, मुलीला इतका मोठा मानसिक धक्का बसलाय आणि ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलेल याचा विचारही कधी मनाला शिवला नाही, असं तिच्या आईनं सांगितलं.

Comments are closed.