Take a fresh look at your lifestyle.

तुमची आवडती ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका होतेय समाप्त ! शेवटही होणार भव्यदिव्य !

इडियट बॉक्स । अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली झी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे. संभाजी राजेंच्या जीवनावर प्रकाश टाकणारी, त्यांचा इतिहास सांगणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचली. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. हि ऐतिहासिक २५ सप्टेंबर २०१७ पासून सुरू झालेली होती.

    शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका आता छोट्या पडद्यावरून निरोपाच्या तयारीला लागली आहे.

   या मालिकेचा शेवट अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक जोरदार तयारी करत आहेत. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने ५०० एपिसोड पूर्ण केले होते. इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि आजच्या तरुणाईला संभाजींची ओळख करून देणं याचं भान ठेवत ही मालिका केली असल्याचं अमोल कोल्हे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. या मालिकेची जागा कुठली मालिका घेणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Comments are closed.