Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाला घाबरून ताहिरा कश्यपने दिल्लीत पोहोचताच घातला मास्क आणि म्हणाली,”आपण…”

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । यावेळी कोरोना विषाणूची दहशत दिल्लीसह भारतातील सर्व प्रमुख भागात पसरली आहे. अशा परिस्थितीत आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने जेव्हा दिल्ली गाठली तेव्हा या आजाराच्या भीतीपोटी विमानतळावरुन बाहेर पडताच तिलाही मास्क घालायला भाग पाडले गेले. दिल्लीच्या छोट्याश्या सहलीवर आलेल्या ताहिराने तिच्या इंस्टाग्रामवर मास्क घातलेला एक फोटो शेअर केला आणि लिहिले की आपण कसे जगतो आहोत , आपल्या पृथ्वीवर काय घडते आहे.

ताहिराने लिहिले, “दिल्लीची ट्रिप … विमानतळावर प्रवेश करताच मला सर्वजण मास्क घालून बसलेले दिसले. लोकांचे चेहरेही दिसत नव्हते आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्यही नव्हते.कोणीही आपापसात बोलत नव्हते, कोणीही खोकला तरी किंवा कोणाला शिंका आल्या , तरी लोक सतर्क होत होते, हे पाहून खूप त्रास झाला. प्रार्थना आणि केवळ प्रार्थना त्यामुळेच गोष्टी योग्य होऊ शकतील, हीच माझी आशा आहे. “


View this post on Instagram

 

Trip to delhi… as I entered the airport I saw everyone wearing masks. The sight in itself started giving me anxiety. How are we living? What’s happening to my earth? I literally had to call up a friend and get comforted as the anxiety was becoming a sort of panic attack. Not seeing faces, not seeing people smile or talk, one sneeze or sniff and people become wary, the sight is really disturbing. This on one side and riots on the other…collective prayers can work is all I know, is all I can hope for. On a lighter note these masks are going to be the next Louis Vuittons, mine is a limited edition with intricate convolutions!! I am so fashionable that even with the mask on I am giving my left profile😁#traveldairies #travelfears

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on Mar 3, 2020 at 6:30am PST

 

मृत्यू जवळून पाहण्याची भीती काय आहे, ताहिराला चांगलेच माहित आहे, कारण काही दिवसांपूर्वीच तिला स्तनाचा कर्करोग झाला होता. ती म्हणते की या आजाराने जिंकणे लढाई जिंकण्यापेक्षा काही कमी नव्हते आणि सर्व श्रेय तिने पती आयुष्मानला दिले आहे. आयुष्मानची कारकीर्दही सध्या भरारी घेते आहे . त्याचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामे करत आहे. नुकत्याच आलेल्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सुमारे ४५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

ताहिराप्रमाणेच बॉलिवूडमधीलही अनेक सेलिब्रिटी कोरोना व्हायरसच्या भीतीने मास्क वापरत आहेत. सनी लिओनी पतीसह मास्क घालून बाहेर फिरत आहे. परिणीती चोप्रानेही विमानतळावरचा मास्क घातलेला फोटो पोस्ट केला होता आणि जनतेने ही सुरक्षित रहावे असे आवाहन केले होते. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे त्यांचे कार्यक्रम आणि सहली रद्द केल्या आहेत.

 

Comments are closed.

%d bloggers like this: