हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यातील नात्याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. कुणी टाईमपास म्हणत होत तर कुणी लव्ह बर्ड्स… इतकंच काय तर काहींनी तर थेट त्यांच्या लग्नाविषयीदेखील भाष्य केले होते. मात्र या सर्व चर्चांवर अद्यापो तमन्ना किंवा विजय दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अनेकदा ठिकाणी तमन्ना आणि विजय याना एकत्र स्पॉट केले गेले. व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले पण दोघांपैकी कुणीच नात्याबाबत बोलायला तयार नव्हतं. यानंतर अखेर आता तमन्नाने या नात्यावर भाष्य केले आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेंटिगची चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अँकेड ठिकठिकाणी दोघांनाही एकत्र स्पॉट केले गेले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असत. त्यामुळे दोघांचेही चाहते त्यांच्या नात्याबाबत जाणून घ्यायला फारच उत्सुक होते. मात्र विजयच्या दहाड सिरिजच्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षी आणि इतर कलाकारांनी विजयला तमन्नाच्या नावाने चिडवायला सुरु केली आणि या अफवांना आणखीच जोर आला. अखेर यावर तमन्ना भाटियाने मौन सोडत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
तमन्नाने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली कि, ‘होय, विजय अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत मी पुढे काही प्लॅनिंग करू शकते. माझा त्याच्यासोबतचा संबंध खूप खास आहे. तो अशी व्यक्ती आहे ज्याची मी काळजी घेते आणि हो.. तो या क्षणी माझं आनंदाच ठिकाण आहे. होय, ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एकमेकांच्या जवळ कसे आलो. भारतात अशीही एक समस्या आहे की एका मुलीला जोडीदारासाठी तिचे संपूर्ण आयुष्य बदलावे लागते. त्या माणसासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. पण तो तसा नाही. त्याला माझे जीवन आणि गोष्टी पूर्णपणे समजतात’. ‘लस्ट स्टोरीज २’ या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया पहिल्यांदाच एकत्र रोमँटिक भूमिकेत दिसणार आहेत. आता तमन्नाच्या या वक्तव्यानंतर त्यांना एकत्र पहायला चाहते उत्सुक आहेत.
Discussion about this post