Take a fresh look at your lifestyle.

‘तान्हाजी’चा नवीन बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ! पाच दिवसांमध्ये कमावले ‘इतके’ कोटी

दोन दिवसांत कमावले 'एवढे' कोटी !

Box Office |दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी सुरु झालेलं असताना देखील, छपाक ला मात देत, तान्हाजी बॉक्स ऑफिस वर सुसाट सुटला आहे. ५ दिवसांमध्ये चित्रपटाने ९०.९६ करोड रुपये कमावले आहेत. त्याच्या मराठी डब व्हर्जनने ५ दिवसात १०. ७ करोड कमावले आहेत. भारतात दोन्ही मिळून चित्रपटाने ष्माधारी पाचव्याच दिवशी पार केली आहे. हिंदी भाषेतील चित्रपट आज साधारण १४ कोटी कमावेल असा अंदाज आहे. आज चित्रपट शंभरी गाठणार यात वाद नाही.

'तान्हाजी'ची शतकीय घोडदौड ! (1)

   आपलं बॉलीवूड एवढे जास्त चित्रपट बनवतं, मग त्याला ५२ शुक्रवार काय पुरणार ! मग एका दिवशी जास्त रिलीज आले, मग प्रेक्षकांची विभागणी आली, मग त्यांची तुलना आली. या १० जानेवारीलाही २ मोठे चित्रपट एकत्र रिलीज झाले, तान्हाजी आणि छपाक. दोन्हींमध्ये सुपरस्टार्स, मग आपोआप लक्ष जातं बॉक्स ऑफिसच्या आकड्यांकडे.

5 दिवसानंतर

तान्हाजी – 90.96 कोटी
छपाक – 21.37 कोटी

पहिल्या दिवशी

तान्हाजी – १५.१० कोटी
छपाक – ४.७७ कोटी

तान्हाजीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. चित्रपटात ती अजून भव्यदिव्य आणि आक्रमक दिसते. चित्रपटात आक्षण दृश्यांवर खूप कष्ट घेतलेले दिसतात. यात सर्व आक्रमकतेची भावना सुरवातीपासून शेवट वपर्यंत ठेवली आहे. महाराष्ट्रात प्रेक्षक त्याला डोक्यावर घेत आहेतच, पण पूर्ण देशही यातून पूर्ण मनोरंजीत होतोय.

दुसरीकडे छपाक हि सत्त्यघटनेवर आधारीत फिल्म आहे, जो संवेदशील दिग्दर्शिका मेघना गिलझार यांनी बनवली आहे. चित्रपटाचा मूळ हेतू हा सामाजिक आणि न्याय व्यवस्थेवर भाष्य करण असा आहे. ट्रेलर ला चांगलेच व्ह्यूव्ह्ज होते, त्यामुळे अपेक्षा चांगल्या होत्या. दीपिकाच स्टारडम ही सध्या शिखराला आहे. या सर्व सोबत चित्रपट रंजकही आहे, पण इथे पर्याय म्हणून तान्हाजी असल्यानेच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम झाला आहे.

एकूणच शेवटी सिनेमा म्हणजे मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन म्हणावं लागेल. तान्हाजी छपाकच्या तुलनेत खूप खिळवून ठेवतो. ट्रेलर वरून हेच अपेक्षितही होतं. आता फक्त पाहायचाय तान्हाजीला १०० कोटी मजल मारायला किती दिवस लागणारेत. आणि छपाक कितीवर जाऊन थांबतो.